रत्नमाला (१९२४ - २४ जानेवारी १९८९) ह्या एक भारतीय चित्रपट सृष्टीतील महिला अभिनेत्री होत्या. त्यांनी अनेक मराठी आणि हिंदी चित्रपटात भूमिका निभावल्या होत्या. त्यांची विशेष ओळख म्हणजे दादा कोंडकेच्या आई म्हणून त्या ओळखल्या जात असत. याचे मुख्य कारण म्हणजे दादा कोंडकेच्या प्रत्येक चित्रपटात रत्नमाला ह्या त्यांच्या आईची भूमिका पार पाडत असत.
त्यांचे मूळ नाव कमल भिवंडकर असे होते. तर त्यांच्या पतीचे नाव राजा पंडित होते. त्यांनी सर्वप्रथम इ.स. १९३८ मध्ये वयाच्या चौदाव्या वर्षी भगवा झेंडा या मराठी चित्रपटात काम केले. या चित्रपटाच्या वेळी त्यांचे नाव कमल भिवंडकर पासून रत्नमालाबाई असे बदलण्यात आले. त्यानंतर प्रथमच त्यांनी ‘'माझी लाडकी’' (१९३९) या चित्रपटात नायिकेची भूमिका निभावली. तर ‘'स्टेशन मास्तर’' हा त्यांचा पहिला हिंदी चित्रपट होता.
रत्नमाला (अभिनेत्री)
या विषयावर तज्ञ बना.