रझिया सुलताना (इ.स. १२०५- इ.स. १२४०) ही दिल्लीचा सुलतान इल्तुमिश याची मुलगी होती. त्याने आपल्या पश्चात रझियाला वारसदार म्हणून निवडले होते.
रझिया ही मध्ययुगीन काळात दिल्लीच्या सिंहासनावर बसलेली बहुधा एकमेव मुस्लिम महिला होती. राज्यकर्ती म्हणून गादीवर आल्यावर तिला अनेक बंडांना तोंड द्यावे लागले. न डगमगता शौर्य आणि कौशल्याच्या जोरावर तिने सर्व बंडे मोडून काढून दिल्ली सलतनतवर आपले स्वामित्व प्रस्थापित केले. रझियाची वाढती शक्ती तसेच पडदा पद्धत न पाळता दरबारात वावरणे काही मुस्लिम सरदारांना मान्य नसतानाही रझियाने त्यांची पर्वा केली नाही. ती शिकारसुद्धा करायची तसेच युद्धामध्ये तिच्या सेनेच नेतृत्व करायची. राजपुतांना काबूत आणण्यासाठी रझियाने रणंथंभोरच्या विरुद युद्धमोहीम आखली होती. तिच्या संपूर्ण राज्यात तिने उत्तम कानूनव्यवस्था प्रस्थापित केली होती, रझियाचे वाढते सामर्थ्य आपल्या हिताआड येत आहे हे पाहून काही तुर्की सरदारांनी तिचा शेवट केला.
रझिया सुलतान
चला या जगात एक खोल डुबकी मारूया.