योहानेस श्टार्क (एप्रिल १५, इ.स. १८७४ – जून २१, इ.स. १९५७) हे विसाव्या शतकातील एक नामांकीत नोबेल पुरस्कार मिळालेले भौतिक शास्त्रज्ञ होते.
त्यांचा जन्म शिकेनहॉफ, बव्हारीया, जर्मनी येथे झाला. त्यांचे प्राथमिक शि़क्षण बेरुथ जिम्नेसियम मध्ये झाले. म्युनिख विद्यापीठातून त्यांनी भौतिकशास्त्र, गणित, रसायनशास्त्र आणि स्फटिकशास्त्र हे विषय घेउन पदवी मिळविली (१८९४ - १८९७). आयझॅक न्यूटनच्या एका भौतिकशास्त्रातिल विषयाला घेउन त्यानी डॉक्टरेट केले.
१९०० पर्यंत त्यांनी त्याच भौतिकशास्त्र संस्थेत वेगवेगळ्या पदावर काही काळ काम केले. त्यानंतर त्यांनी गॉटींजेन विद्यापीठात बिनपगारी शिक्षकाची नोकरी पत्करली.
१९०८ मध्ये श्टार्क यांना नामांकीत RWTH आखेन विद्यापीठात प्राध्यापक पदाची नोकरी लागली. १९२२ पर्यंत त्यांनी ग्रेफ्सवाल्ड विद्यापीठासह अनेक नामांकीत विद्यापीठांत काम आणि संशोधन केले. १९१९ मध्ये त्यांना कॅनल किरणातील डॉप्लर परिणाम आणि विद्युत क्षेत्रातील वर्णपटाचे विभाजन (ज्याला नंतर स्टार्क परिणाम असे नाव मिळाले) यावरील संशोधनासाठी भौतिकशास्त्रातील नोबेल पारीतोषिक मिळाले. १९३३ पासून ते १९३९ मध्ये त्यांची निवृत्ती होईपर्यंत त्याची निवड फिसिकालीश टेकनिश बुन्देसान्सस्टाल्ट आणि डॉइश फॉरशूंग्सगेमेंशाफ्ट या संस्थेमध्ये अध्यक्षपदी झाली.
श्टार्क यांनी त्यांच्या कार्यकालात ३००हून अधिक विद्यूतशास्त्र आणि इतर संबंधित विषयावर लेख लिहीले. नोबेल पारीतोषीका व्यतिरीक्त त्यांना विएन्ना अकॅडमी ऑफ सायन्सेसचे बॉगर्टनर पारितोषिक (१९१०), गॉटींजेन विएन्ना अकॅडमी ऑफ सायन्सेसचे वालब्रूच पारितोषिक (१९१४), रोम अकॅडमीचे मॅट्यूसी पदक त्यांना मिळाले. त्यांनी लुईस उप्लर यांच्याशी लग्न केले. तिच्यापासून त्याना पाच मुले झाली.
विज्ञानविश्वात त्यांचा परिचय १९१३ मध्ये त्यांनी लावलेल्या श्टार्क परिणाम मुळे झाला.
योहानेस श्टार्क
तुम्हाला हे नक्कीच माहित नसेल!