येल्गाव्हा

थोडक्यात पण महत्त्वाचे.

येल्गाव्हा

येल्गाव्हा तथा मिटाउ हे लात्व्हियामधील एक राज्य शहर आहे. हे शहर देशाच्या मध्य भागात राजधानी रिगाच्या नैऋत्येस सुमारे ४१ किलोमीटर (२५ मैल) अंतरावर आहे.

येल्गाव्हा लिलुपे नदीच्या उजव्या तीरावर समुद्रसपाटीपासून केवळ ३.५ मीटर (११.५ फूट) उंचीवर सुपीक मैदानावर वसलेले आहे. नदीला पूर आल्यावर अनेकदा हे पाणी शहरात घुसते. येथील रेल्वे स्थानक रिगा, लिथुएनिया, पूर्व आणि पश्चिम लात्व्हिया तसेच बाल्टिक समुद्राकडे जाणाऱ्या सहा रेल्वेमार्गांचे जंक्शन आहे. याशिवाय येथून जवळच येल्गाव्हा वायुसेना तळ सुद्धा आहे.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →