युवराज सिंग (जन्म १२ डिसेंबर १९८१) हा भारतीय क्रिकेट संघातील एक प्रमुख डावखूरा फलंदाज आहे. माजी वेगवान गोलंदाज आणि पंजाबी अभिनेते योगराजसिंग हे युवराज सिंगचे वडील आहेत. २००० सालापासुन तो भारतीय एकदिवसीय क्रिकेट संघाचा सदस्य आहे. २००३ मध्ये त्याने पहिला कसोटी सामना खेळला. २००७ ते २००८ पर्यंत तो भारतीय एकदिवसीय संचाचा उपकर्णधार होता. २०११ च्या क्रिकेट विश्वचषकात त्याला मालिकावीर म्हणून घोषित केले होते.
२०११ मध्ये त्याला त्याच्या डाव्या फुफ्फुसाचा एक कर्करोगाच्या गाठीचे निदान झाले आणि इनडियनॅपलिस मध्ये बोस्टन मध्ये कर्करोग संशोधन संस्था तसेच वैद्यक सुविधा येथे केमोथेरपीच्या उपचार करून घेतला. मार्च २०१२ मध्ये युवराजला केमोथेरपीच्या तिसऱ्या आणि अंतिम चक्र पूर्ण केल्यानंतर हॉस्पिटलमधुन मुक्त करण्यात आले आणि एप्रिल महिन्यात तो भारतामध्ये परत आला. राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी सन २०१२ मध्ये युवराज सिंहला भारतातील दुसऱ्या सर्वोच्च क्रीडा अर्जुन पुरस्कार बहाल केला. न्यूझीलॅंड विरुद्ध् टि-२० सामन्यात सप्टेंबर महिन्यात तो क्रिकेटमध्ये पुन्हा परतला. क्रिकेटमध्ये यशस्वी खेळाडू म्हणून दबदबा असलेला युवराज आपल्या वादग्रस्त विधानांनीही चर्चेत राहिला आहे. रोहित शर्माशी इन्स्टाग्रामवर चॅट करताना युझवेंद्र चहलविषयी जातीविषयक टिप्पणीमुळे तो वादात सापडला होता. त्यामुळे त्याला माफीही मागावी लागली होती.
युवराजसिंह
थोडक्यात पण महत्त्वाचे.