युरोपियन संसद हे युरोपियन संघाच्या तीन विधिमंडळांपैकी एक आहे. देशाची संसद आहे. युरोपियन संघाची परिषद व युरोपियन आयोग समवेत युरोपियन संसदेकडे युरोपामधील कायदेतत्त्व चालवण्याची जबाबदारी आहे. भारतीय संसदेखालोखाल युरोपियन संसद ही जगातील दुसऱ्या क्रमांकाची लोकशाही मार्गाने निवडली जाणारी संस्था आहे. येथील प्रतिनिधी युरोपियन संघामधील मतदारांतर्फे थेट निवडून येतात व त्यांचा कार्यकाळ ५ वर्षाचा असतो. युरोपियन संसदेचे मुख्यालय फ्रान्सच्या स्त्रासबुर्ग शहरात असून संसदेच्या सरचिटणीसाचे कार्यालय लक्झेंबर्ग येथे आहे.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →युरोपियन संसद
एका नवीन दृष्टिकोनातून पहा.