युझ्नो-साखालिन्स्क (रशियन: Ю́жно-Сахали́нск) हे रशिया देशाच्या साखालिन ओब्लास्ताचे मुख्यालय आहे. आहे. युझ्नो-साखालिन्स्क शहर रशियाच्या अति पूर्व भागातील साखालिन बेटाच्या दक्षिण टोकाला प्रशांत महासागराच्या किनाऱ्यावर वसले आहे. २०१० सालच्या गणनेनुसार येथील लोकसंख्या १.८१ लाख होती.
१८८२ साली रशियन साम्राज्यातील कैद्यांच्या मदतीने येथे वस्ती बनवली गेली व तिचे नाव व्लादिमिरोव्का असे ठेवण्यात आले. इ.स. १९०४-०५ दरम्यान झालेल्या रशिया–जपान युद्धानंतर साखालिन बेटाचा दक्षिणेकडील अर्धा भाग जपानच्या अधिपत्याखाली आणला गेला. जपानने ह्या गावाचे नाव बदलून तोयोहारा असे ठेवले. दुसऱ्या महायुद्धात जपानचा पराभव झाल्यानंतर सोव्हिएत संघाने संपूर्ण साखालिन बेटावर कब्जा मिळवला व १९४६ साली हे शहर पुन्हा आपल्या अधिपत्याखाली आणले. ह्याचदरम्यान युझ्नो-साखालिन्स्क हे नाव ठेवले गेले.
ह्या भागातील खनिज तेल व नैसर्गिक वायूच्या मोठ्या साठ्यांमुळे युझ्नो-साखालिन्स्कची झपाट्याने प्रगती झाली आहे. जगातील अनेक मोठ्या पेट्रोलियम कंपन्यांची कार्यालये येथे स्थित आहेत.
युझ्नो-साखालिन्स्क
चर्चा करण्यासाठी एक आकर्षक विषय.