यशवंत विष्णू चंद्रचूड (जुलै १२, १९२०; पुणे, मुंबई प्रांत - जुलै १४, २००८; मुंबई) हे भारताचे माजी सरन्यायाधीश होते. खेड तालुक्यातील कन्हेरसर हे त्यांचे मूळ गाव आहे. यांनी सर्वाधिक काळ - म्हणजे २२ फेब्रुवारी, १९७८ पासून ११ जुलै, १९८५ रोजी निवृत्त होईपर्यंत ७ वर्षे व ४ महिने सरन्यायाधीशपद भूषविले. २८ ऑगस्ट १९७२ रोजी भारताच्या सर्वोच्च न्यायालयात न्यायाधीशपदी यांची नेमणूक झाली.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →यशवंत विष्णू चंद्रचूड
तुम्हाला हे नक्कीच माहित नसेल!