यक्ष प्रश्न

चर्चा करण्यासाठी एक आकर्षक विषय.

पांडव वनवासांत द्वैतवनांत असतांना तृषाहरणासाठीं एका सरोवराकडे गेल्यावेळीं तेथील जलप्राशन करणार इतक्यांत अंतरिक्षांतून यक्षवाणी झाली कीं, माझ्या प्रश्नांचें उत्तर देईल, त्यानेंच हें जल प्राशन करावें असा माझा नियम आहे. परंतु क्रमानें नकुल, सहदेव, अर्जुन व भीम या चौघांनींहि यक्षप्रश्नाचें उत्तर न देतां जलप्राशन केल्यामुळें ते गतप्राण होऊन पडले. शेवटीं युधिष्ठिरानें त्या यक्षाच्या सर्व प्रश्नांचीं समर्पक उत्तरें दिल्यावर ते चौघेहि धर्माचे भ्राते जिवंत झाले. हा भाग महाभारतांत आरण्यक पर्वांत आला आहे. यक्ष व युधिष्ठिर यांच्यामधील ही प्रश्नोत्तरमालिका आत्मतत्त्वाचा निर्णय करण्यासाठीं आरंमिली आहे. प्रश्न व उत्तरें खालील प्रमाणें

प्र.सूर्याला कोण उदित करतो?

उ.ब्रह्मापासून सूर्याचा उदय होतो.

प्र.त्याचे साहाय्यकर्ते कोण?

उ.देव हे त्याचे साहाय्यकर्तं.

प्र.त्याला अस्तास कोण नेतो?

उ.धर्म.

प्र.तो कशाच्या आधारानें असतो?

उ.सत्याच्या आधारानें.

प्र.पुरुष कशानें श्रोत्रिय होतो?

उ.वेदाध्ययन केल्यानें.

प्र.त्याला ब्रह्मप्राप्ति कशानें होतें?

उ.तपानें.

प्र.तो साहाय्यवान् ‍ कशानें होतो?

उ.धैर्याच्या योगानें.

प्र.तो बुद्धिमान् ‍ कशानें होतो?

उ.वृद्ध आचार्यांच्या सेवेनें.

प्र.ब्राह्मणांचें देवत्व कोणतें?

उ.स्वाध्याय.

प्र.त्यांचें सदाचरण कोणतें?

उ.तपश्चर्या.

प्र.त्यांच मानवी भाव कोणता?

उ.मरण.

प्र.त्यांचें असदाचरण कोणतें?

उ.परनिंदा.

प्र.क्षत्रियांचें देवत्व कोणतें?

उ.धनुर्विद्या.

प्र.त्यांचा परंपरागत धर्म कोणता?

उ.यज्ञ करणें.

प्र.त्यांचा मानवी भावा कोणता?

उ.युद्धांत भय व पलायन.

प्र.त्यांचा असदाचरण कोणतें?

उ.शरणगताचें रक्षण न करणें.

प्र.यज्ञासंबंधीं साम कोणतें?

उ.प्राण.

प्र.तत्संबंधीं मुख्य यजुर्मंत्र कोणता?

उ.मन.

प्र.यज्ञाला आधारभूत असें एक काय आहे?

उ.ऋग्वेद.

प्र.कशाशिवाय यज्ञाचें अस्तित्त्व असूं शकत नाहीं?

उ.ऋग्वेदाशिवाय.

प्र.सर्व प्रकारें तृप्ति करणारांमध्यें श्रेष्ठ कोण?

उ.पर्जन्य.

प्र.पितरांचें संतर्पण करणारांत उत्तम कोण?

उ.बीज.

प्र.इहलोकीं स्वस्थतेची इच्छा करणारांना साधन काय?

उ.गाय.

प्र.संततीची इच्छा कराणारांना श्रेष्ठ काय?

उ.पुत्र.

प्र.कोणता पुरुष जिवंत असून मृतवत् ‌‍?

उ.देवता, अतिथि, सेवक, पितर आणि आत्मा या पांचांना जो कांहींच अपर्ण करीत नाहीं तो.

प्र.पृथ्वीपेक्षां श्रेष्ठ काय?

उ.माता.

प्र.आकाशापेक्षां उंच काय?

उ.पिता.

प्र.बाय़ूपेक्षां चंचल काय?

उ.मन.

प्र.मनुष्याला सर्वांत वाढत जाणारी गोष्ट कोणती?

उ.चिंता.

प्र.निद्रेंतहि डोळे मिटत नाहींत असा कोण?

उ.मत्स्य.

प्र.उत्पन्न झालें असतां हालचाल नसतें असें काय?

उ.अंडें.

प्र.कोणाला ह्रदय नाहीं?

उ.दगडाला.

प्र.वेगानें वाढतें कोण?

उ.नदी.

प्र.प्रवाशाला मित्र कोण?

उ.समुदायानें असणें.

प्र.सज्जनाला घरीं मित्र कोण?

उ.भार्या.

प्र.रोग्याला मित्र कोण?

उ.औषध.

प्र.आसन्नमरण झालेल्यास मित्र कोण?

उ.दान.

प्र.एकाकी मार्ग क्रमनारा कोन?

उ.सूर्य.

प्र.पुनः पुनः जन्म घेणारा कोण?

उ.चंद्र.

प्र.शीताला औषध कोणतें?

उ.अग्नि.

प्र.सर्वांत मोठें उत्पत्तिस्थान कोणतें?

उ.भूमि.

प्र.धर्माच्या पर्यवसानाचें मुख्या स्थान कोणतें?

उ.दक्षता.

प्र.यशःप्राप्तीचें मुख साधन कोणतें?

उ.दान.

प्र.स्वर्गप्राप्तीचें मुख्य साधन काय?

उ.सत्य.

प्र.सुखाचें मुख्य निधान कोणतें?

उ.शील.

प्र.मनुष्याचा आत्मा कोण?

उ.पुत्र.

प्र. त्याचा दैवानें दिलेला मित्र कोणता?

उ.भार्या.

प्र.त्याचें जीवन कोणतें?

उ.पर्जन्य.

प्र.त्याला मुख्य आधार काय आहे?

उ.दान.

प्र.द्र्व्यप्राप्तीच्या साधनांत उत्तम साधन कोणतें?

उ.दक्षता.

प्र.उत्तम धन कोणतें?

उ.विद्याधन.

प्र.उत्तम लाभ कोणता?

उ.आरोग्य.

प्र.श्रेष्ठ सुख कोणतें?

उ.समाधान.

प्र.इह लोकीं श्रेष्ठ धर्म कोणता?

उ.आश्रितांचें रक्षण.

प्र. अक्षय्य फलद्रूप होणारा धर्म कोणता?

उ.वैदिक धर्म.

प्र. कशाचें नियमन केलें आसतां दुःख करण्याची पाळी येत नाहीं?

उ.मनःसंयमन.

प्र.कोणाची संगति केली असतां वाया जात नाहीं?

उ.सज्जनांची संगति.

प्र.कशाच्या त्यागानें मनुष्य प्रिय होतो?

उ.वृथा मान.

प्र.शोक कराण्याचा प्रसंग काय टाळल्यानें येत नाहीं?

उ.क्रोध.

प्र.कोणत्या त्यागानें मनुष्य संपत्तिमान ‌‍ होतो?

उ.आशा.

प्र.कशाचा त्याग केल्यातें तो मुखी होतो?

उ.लोभ.

प्र.मृत पुरुष कोणता?

उ.दरिद्री.

प्र.राष्ट्र मृत कशानें होतें?

उ.अराजकानें.

प्र.मृत श्राद्व कोणतें?

उ.अधीत्त ब्राह्मणाभावीं.

प्र.मृत यज्ञ कोणता?

उ.दक्षिणारहित.

प्र. कोठून आलेलें पाणी श्रेष्ठ?

उ.आकाशापासून.

प्र.अन्न कोणतें?

उ.गोदुग्ध.

प्र.विष कोणतें?

उ.याचना.

प्र.श्राद्धाला योग्य काल कोणता?

उ.खाध्यायतत्पर ब्राह्मणाची अनुकुलता.

प्र.सर्व संपत्तिमान् असा पुरुष कोणता?

उ.ज्याची कीर्ति दिगंत गाजत आहे असा, प्रिय व अप्रिय, सुख व दुःख तसेंच येऊन गेलेलें व भावी सुख-दुख हीं समान लेखणारा पुरुष. सर्व संपत्तीनें युक्त होय. (म. भा. संशोधित आवृत्ति आरण्यकपर्व भाग २ अ. २९७)

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →