म.ए.सो. गरवारे कॉलेज ऑफ कॉमर्स हे पुण्यातील एक वाणिज्य महाविद्यालय असून याची स्थापना इ.स. १९६७ साली 'म.ए.सो. कॉलेज ऑफ कॉमर्स' या नावाने झाली होती. उद्योगपती श्री. आबासाहेब गरवारे यांच्या गौरवार्थ महाविद्यालयाचे नामकरण १९७१ साली ‘म.ए.सो. गरवारे कॉलेज ऑफ कॉमर्स’ असे झाले. ११वी (कनिष्ठ महाविद्यालय) ते पी.एच.डी. पर्यंतचे शिक्षण येथे दिले जाते. हे महाविद्यालय सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाशी संलग्नित आहे, तसेच विश्वविद्यालय अनुदान आयोग (युजीसी)ची महाविद्यालयाला मान्यता आहे. ‘राष्ट्रीय मूल्यांकन आणि प्रमाणन परिषद’ (नॅक) या राष्ट्रीय पातळीवरील समितीच्या तिसऱ्या फेरीतील पुनर्मूल्यांकनात ०४ पैकी ३.४५ गुणांसह ‘अ’ श्रेणी म.ए.सो. कॉलेज ऑफ कॉमर्सला मिळाली आहे. ग्रंथालय, स्वतंत्र २ अभ्यासिका, संगणक कक्ष व अन्य सर्व सुविधा उपलब्ध असलेल्या २ इमारती महाविद्यालयाच्या आवारात आहेत. तसेच महाविद्यालयाचे वसतिगृह महाविद्यालयाच्याच आवारात आहे.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →म.ए.सो. गरवारे वाणिज्य महाविद्यालय
या विषयातील रहस्ये उलगडा.