म्यानमार (अधिकृत नाव: बर्मी: , इंग्लिश: Republic of the Union of Myanmar, रिपब्लिक ऑफ यूनियन ऑफ म्यानमार; जूनी नावे: बर्मा, ]ब्रह्मदेश) हा आग्नेय आशियातील एक देश आहे. ६,७६,५७८ वर्ग कि.मी. क्षेत्रफळ असलेला हा देश क्षेत्रफळाच्या दृष्टीने आग्नेय आशियातील सर्वांत मोठा देश आहे. या देशाची लोकसंख्या जवळपास ६ कोटी असून लोकसंख्येच्या बाबतीत याचा जगात २४ वा क्रमांक आहे. या देशाच्या ईशान्येस चीन, पूर्वेस लाओस, आग्नेयेस थायलंड, पश्चिमेस बांग्लादेश, वायव्येस भारत हे देश असून नैऋत्येस बंगालचा उपसागर आहे. येथील बहुसंख्य जनता बौद्ध धर्मीय आहे. म्यानमारला एकूण परीघाच्या एक तृतीयांश - म्हणजे १,९३० कि.मी. - लांबीची मोठी किनारपट्टी लाभली आहे. पेट्रोलियम, शिसे, जस्त, तांबे, टंगस्टन ही येथील प्रमुख खनिजे आहेत.
ऐतिहासिक काळापासून म्यानमारमधील वांशिक विविधता राजकारणावर व समाजगतिकीवर प्रभाव टाकत आली आहे.म्यानमारमध्ये पूर्वी राजेशाही होती. इंग्रजांनी म्यानमारच्या थिबा राजाचा पराभव करून म्यानमार बळकावला/जिंकला आणि थिबाला कैद करून भारतात रत्नागिरीत आणून ठेवले.४ जानेवारी इ.स.१९४८ रोजी म्यानमारला इंग्रजांपासून स्वातंत्र्य मिळाले. नंतर आधुनिक काळातदेखील या देशाच्या राजकीय पटलावर वांशिक तणावांची पडछाया पडल्याचे दिसून येते. इ.स. १९९२ सालापासून म्यानमारची शासनव्यवस्था जनरल थान श्वे यांच्या नेतृत्वाखालील लष्करप्रणीत आघाडी सरकाराच्या नियंत्रणात आहे.
म्यानमार
या विषयातील रहस्ये उलगडा.