आसियान (इंग्लिश: Association of Southeast Asian Nations) ही आग्नेय आशियामधील १० स्वतंत्र देशांची एक राजकीय व आर्थिक संघटना आहे. आसियानची स्थापना इंडोनेशिया, मलेशिया, फिलिपाईन्स, सिंगापूर व थायलंड ह्या देशांनी ८ ऑगस्ट १९६७ रोजी केली. त्यानंतर आसियानचा विस्तार करून ब्रुनेई, बर्मा, कंबोडिया, लाओस व व्हियेतनाम ह्या देशांना प्रवेश देण्यात आलेला आहे.
आसियान ही अग्नेय आशियातील 10 देशांची संघटना आहे. यात ब्रुनेइ, म्यानमार, कंबोडिया, इंडोनेशिया, लाओस, मलेशिया, फिलीपाइन्स, सिंगापूर, थायलंड आणि व्हिएतनाम हे देश येतात. याचे सचिवालय जकार्ता येथे आहे. 8 ऑगस्ट 1967 रोजी ही संघटना स्थापण करण्याची घोषणा झाली, यालाच "बॅकाॅक घोषणा" म्हणतात. स्थापणेवेळी याचे इंडोनेशिया, मलेशिया, फिलीपाइन्स, सिंगापूर, थायलंड हे पाच देश होते. त्यानंतर ब्रुनेइ हा सहावा देश जोडला गेला. 1995 साली व्हिएतनाम, 1997 साली लाओस व म्यानमार आणि 1999 साली कंबोडिया हे देश जोडले गेले. जगाच्या एकूण जमिनक्षेत्रापैकी 3% क्षेत्र आसियान देशांनी व्यापलेले आहे. जगाच्या लोकसंख्येपैकी 8.8% लोकसंख्या आसियान देशांची आहे. सर्व आसियान देशांची मिळून एक अर्थव्यवस्था मानली तर ती जगातील सातव्या क्रमांकाची अर्थव्यवस्था आहे. आसियानचे अध्यक्षपद दरवर्षी सदस्य राष्ट्रांच्या इंग्रजी नावांच्या वर्णक्रमानुसार फिरते.
20 वी आसियान-भारत शिखर परिषद 2023 नुकतीच जकार्ता, इंडोनेशिया येथे झाली.
आसियान
जाणून घ्या आश्चर्यकारक तथ्ये.