मॉस्को मेट्रो (रशियन: Московский метрополитен) ही रशियाच्या मॉस्को शहरामधील उपनगरी जलद वाहतूक रेल्वे सेवा आहे. ही रेल्वे मॉस्कोसोबत शेजारील क्रास्नोगोर्स्क ह्या शहराला देखील वाहतूक पुरवते. १९३५ साली ११ किमी लांब मार्गावर १३ स्थानकांसह सुरू झालेली मॉस्को मेट्रो सोव्हिएत संघामधील सर्वात पहिली भुयारी रेल्वे होती. मॉस्को मेट्रोचे सध्या एकूण ३०६.७ किमी लांबीचे १४ मार्ग व २०६ स्थानके आहेत. मॉस्को मेट्रो ही युरोपामधील सर्वात वर्दळीची तर जगातील दुसऱ्या क्रमांकाची (टोक्यो सबवेखालोखाल) नागरी रेल्वे वाहतूक सेवा आहे. दररोज सुमारे ६५.५ लाख प्रवासी ह्या रेल्वेने प्रवास करतात.
मॉस्को मेट्रो आपल्या अतिखोलातून मार्गांसाठी व सुशोभित स्थानकांसाठी प्रसिद्ध आहे. जोसेफ स्टॅलिनने ह्या मेट्रोवर खर्च करताना कोणतेही बंधन पाळले नाही. येथील अनेक स्थानके संपूर्ण संगमरवरी आहेत व त्यांना भव्य व प्रशस्त असे स्वरूप दिले गेले आहे. शीत युद्धादरम्यान बांधले गेलेले काही मार्ग हेतूपुरस्परपणे अतिखोलातून काढण्यात आले ज्यांचा वापर संभावी अणुहल्ल्यादरम्यान नागरिकांना निवारा पुरवण्यासाठी केला जाणार होता.
मॉस्को मेट्रो
हा लेख तुमचा दृष्टिकोन बदलेल.