मॉस्को प्रमाणवेळ

थोडक्यात पण महत्त्वाचे.

मॉस्को प्रमाणवेळ

मॉस्को प्रमाणवेळ ही रशिया देशाच्या ११ प्रमाणवेळांपैकी एक आहे. २६ ऑक्टोबर २०१४ पासून ही वेळ यूटीसी+०३:०० ह्या कालमानासोबत संलग्न आहे. २०११ ते २०१४ दरम्यान मॉस्को प्रमाणवेळ यूटीसी+०४:०० ह्या कालविभागावर चालत असे. रशियामध्ये उन्हाळी प्रमाणवेळ वापरात नसल्यामुळे संपूर्ण वर्षभर मॉस्को प्रमाणवेळ एकाच काममानावर असते.

मॉस्को प्रमाणवेळ रशियाच्या पश्चिमेकडील बहुतेक सर्व युरोपीय भागात वापरात आहे व मॉस्को, सेंट पीटर्सबर्ग, सोत्शी इत्यादी मोठी शहरे ह्याच प्रमाणवेळेवर आहेत.

सरकारी पातळीवर देखील मॉस्को प्रमाणवेळेला रशियामध्ये मोठे महत्त्व आहे. सायबेरियन रेल्वेसहित रशियामधील सर्व रेल्वे मॉस्को प्रमाणवेळेवर धावतात. तसेच रशियामधील इतर प्रमाणवेळा मॉस्को प्रमाणवेळेच्या संदर्भात सांगितल्या जातात.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →