मेहरबान (१९६७ चित्रपट)

चर्चा करण्यासाठी एक आकर्षक विषय.

मेहरबान हा १९६७ चा भारतीय हिंदी भाषेतील नाट्य चित्रपट आहे जो ए. भीमसिंग यांनी लिहिलेला आणि दिग्दर्शित केला आहे आणि ए.व्ही. मैयप्पा यांनी निर्मित केला आहे. हा चित्रपट १९५३ मध्ये आलेल्या जोग बियोग या बंगाली चित्रपटाचा रिमेक आहे, जो आशापूर्णा देवी यांच्या त्याच नावाच्या कादंबरीवर आधारित आहे. या चित्रपटात अशोक कुमार, सुनील दत्त, नूतन, मेहमूद, शशिकला आणि सुलोचना लाटकर यांच्या भूमिका आहेत. हा २१ एप्रिल १९६७ रोजी प्रदर्शित झाला.

ह्या चित्रपटासाठी दिग्दर्शक भीमसिंग यांना फिल्मफेर सर्वोत्तम दिग्दर्शक पुरस्काराचे नामांकन मिळाले होते; या पुरस्कारासाठी त्यांचे हे एकमेव नामांकन होते.

चित्रपटातील गीत रवी यांनी संगीतबद्ध केले होते आणि राजिंदर कृष्ण यांनी लिहिली होती.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →