मेरी रॉय

तुम्हाला हे नक्कीच माहित नसेल!

मेरी रॉय या एक भारतीय शिक्षणतज्ज्ञ आणि महिला हक्क कार्यकर्त्या आहेत. त्यांना १९८६ मध्ये सर्वोच्च न्यायालयात त्यांच्या केराली सीरियन ख्रिश्चन समुदायाच्या वारसा कायद्याविरोधात खटला जिंकण्यासाठी ओळखल्या जातात. यानुसार सीरियन ख्रिश्चन महिलांना त्यांच्या पुरुष भावंडांसह त्यांच्या वडिलोपार्जित मालमत्तेत समान अधिकार सुनिश्चित करण्यात आला. तोपर्यंत त्यांच्या सीरियन ख्रिश्चन समाजाने १९१६ च्या त्रावणकोर उत्तराधिकार कायदा आणि कोचीन उत्तराधिकार कायदा, १९२१ च्या तरतुदींचे पालन करण्यात येत होते. तर भारतात इतरत्र तोच समुदाय १९२५ च्या भारतीय उत्तराधिकार कायद्याचे पालन करत होता.

स.न. १९१६ च्या त्रावणकोर उत्तराधिकार कायद्यानुसार मेरी रॉयला कौटुंबिक मालमत्तेचा हिस्सा नाकारण्यात आला. त्यांच्या वडिलांच्या मृत्यूनंतर त्यांनी तिच्या भावांवर खटला भरला. या प्रकरणानेच भारतीय न्यायालयीन व्यवस्थेतून मार्ग काढला आणि त्या जिंकल्या.

त्या पल्लिकूदाम शाळेच्या (पूर्वी कॉर्पस क्रिस्टी हायस्कूल) संस्थापक संचालक आहेत. ही शाळा कलाथिलपाडी येथे आहे. हे एक कोट्टायम शहरातील एक उपनगर आहे. हे शहर केरळ राज्यात आहे . तिची मुलगी मॅन बुकर पुरस्कार विजेत्या अरुंधती रॉय आहेत.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →