मॅकडोनल्ड्स कॉर्पोरेशन ही अमेरिकन फास्ट फूड कंपनी आहे, अमेरिकेच्या कॅलिफोर्निया मधील सॅन बर्नार्डिनो येथे रिचर्ड आणि मॉरिस मॅकडोनाल्ड यांनी संचालित केलेले रेस्टॉरंट म्हणून १९४० मध्ये स्थापना केली. मॅकडोनल्ड्स ही जगातील सर्वात मोठी रेस्टॉरंट साखळी आहे जी २०१८ पर्यंत ३७,८५५ आऊटलेट्समध्ये दररोज १०० पेक्षा जास्त देशांमध्ये दररोज ६९ दशलक्ष ग्राहकांची सेवा देत आहे. मॅकडोनल्ड्स त्याच्या हॅम्बर्गर, चीजबर्गर आणि फ्रेंच फ्राईजसाठी परिचित असले, तरी त्यामध्ये चिकन उत्पादने, न्याहारीच्या वस्तू, शीतपेय, मिल्कशेक्स, रॅप्स आणि मिष्टान्न देखील दिसतात.
ही अमेरिकेची संयुक्त संस्थानेस्थितकंपनी असून जोरदार जाहिराती व दर्जेदार विपणन व्यवस्थेद्वारे जगभर आपल्या दुकानांचे जाळे विणले आहे. हॉलिवूडच्या बहुतेक नवीन येणाऱ्या सर्व चित्रपटांच्या जाहिराती तसेच त्यावर आधारीत खेळणी ही कंपनी आपल्या साखळीतील दुकानांद्वारे वितरीत करत असते. मॅकडोनाल्ड हा शब्द त्यासाठी त्यांनी प्रताधिकारीत केला आहे. मात्र सतत याच कंपनीचे खाद्यपदार्थ खाऊन मेद (जाडपणा) वाढतो असा प्रचारही या कंपनीचे विरोधक करत असतात. भारताही या कंपनीने आपले व्यवसाय जाळे विणले आहे व अल्पावधीत लोकप्रियताही मिळवली आहे असे दिसून येते. जास्त दिवस अन्न पदार्थ टिकवण्यासाठी गोठवलेले अन्नपदार्थ वापरण्याकडे या कंपनीचा कल असतो.
मॅक्डॉनल्ड्स
तुम्हाला हे नक्कीच माहित नसेल!