केएफसी तथा केंटकी फ्राईड चिकन ही एक मूळ अमेरिकन बहुराष्ट्रीय फास्ट फूड रेस्टॉरंट साखळी आहे. याच्या होटलांमध्ये मुख्यत्वे कोंबडीजन्य पदार्थ मिळतात. या कंपनीचे मुख्यालय लुईव्हिल, केंटकी येथे आहे.
केएफसी ही मॅक्डॉनल्ड्जनंतर जगातील दुसऱ्या क्रमांकाची रेस्टॉरंट साखळी आहे ज्याची डिसेंबर २०१८ नुसार १३६ देशांमध्ये जागतिक स्तरावर २२,६२१ स्थाने आहेत. ही साखळी यम! ब्रॅंडची उपकंपनी आहे. पिझ्झा हट , टॅको बेल आणि विंगस्ट्रिट या साखळ्या केफसीच्यी भगिनी कंपन्या आहेत.
केएफसी
थोडक्यात पण महत्त्वाचे.