अलेक्सेई मॅक्झिमोविच पेश्कोव्ह (मार्च २८, १८६८ - जून १८, १९३६) हा एक रशियन लेखक व राजकीय कार्यकर्ता होता. त्याला मॅक्झिम गॉर्की (रशियन: माक्सिम गोर्की) या टोपणनावाने ओळखले जाते. तो समाजवादी सत्यवाद या साहित्यपद्धतीच्या जनकांपैकी एक मानला जातो. त्याचा जन्म निझ्नी नोव्होगोरोड येथे व मृत्यू मॉस्को येथे झाला. १९०६ ते १९१३ व १९२१ ते १९२९ हा काळ त्याचे परदेशी, मुख्यत्वेकरून काप्री येथे वास्तव्य होते. सोवियत संघामध्ये परतल्यावर त्याने तेथील सांस्कृतिक नियम मान्य केले. यानंतरही त्याला देश सोडण्याची परवानगी नव्हती.गोर्कि या शब्दाचा अर्थ 'कटू' असा होतो.मॅक्सिम गोर्कि यांच्या आयुष्यात अनेक कटू प्रसंगांना त्यांना तोंड द्यावे लागले.यावरून। कदाचित त्यांनी हे टोपण नाव निवडले असावे.गोर्कि एका स्टीमर मध्ये काम करीत असतांना तेथील एका स्वयंपाक्याकडून त्यांना वाचनाची आवड निर्माण झाली. त्यांनी 'मकरचुद्रा' नावाची एक कथा लिहिली व ती मॅक्सिम गोर्कि या टोपण नावाने छापली.पुढे त्यांचे हेच नाव कायम राहिले.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →मॅक्झिम गॉर्की
थोडक्यात पण महत्त्वाचे.