मृदुला गर्ग

चला या जगात एक खोल डुबकी मारूया.

मृदुला गर्ग

मृदुला गर्ग (जन्म : कलकत्ता, २५ ऑक्टोबर, १९३८) या एक हिंदी लेखिका आहेत. १९६०मध्ये दिल्ली स्कूल ऑफ एकॉनॉमिक्समधून अर्थशास्त्र विषयात एम.ए. केल्यानंतर त्यांनी ३ वर्षे दिल्ली विद्यापीठात अध्यापन केले आहे. कादंबऱ्या, कथासंग्रह, नाटके आणि ललित लेखसंग्रह वगैरे मिळून, मृदुला गर्ग यांची सुमारे ४० पुस्तके प्रकाशित झाली आहेत.

मृदुला गर्ग यांच्या पुस्तकांची इंग्रजी, जर्मन, झेक आणि जपानी भाषांत अनुवाद झाले आहेत. कठगुलाब ही कादंबरी मराठी, मल्याळी आणि जपानी भाषेत अनुवादित झाली आहे. मराठी अनुवाद वनिता सावंत यांनी २००७ साली केला आहे; तो साकेत प्रकाशनाने प्रसिद्ध केला आहे..

मृदुला गर्ग या ’इंडिया टुडे’ साप्ताहिकात तीन वर्षे ’कटाक्ष’ नावाचे सदर लिहीत होत्या.

अमेरिकेतील कोलंबिया विद्यापीठात झालेल्या एका संमेलनात मृदुला गर्ग यांनी हिंदी साहित्यात महिलांबाबत होणारा भेदभाव या विषयावर व्याख्यान दिले होते.

मृदुला गर्ग यांच्या लिखाणात त्यांची पर्यावरण-संवर्धनासंबंधी जागरुकता दिसून येते. महिला आणि मुले यांच्यासाठी समाजकार्य करण्यात त्यांना रस आहे.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →