मृदा आरोग्य कार्ड योजना

हा लेख तुमचा दृष्टिकोन बदलेल.

मृदा आरोग्य कार्ड योजना

मृदा आरोग्य कार्ड योजनाही भारत सरकारने फेब्रुवारी २०१५ मध्ये सुरू केलेली एक योजना आहे. १९ फेब्रुवारी २०१५ला सुरतगड (राजस्थान) येथून या योजनेचा प्रारंभ करण्यात आला ,या योजने अंतर्गत सरकारने शेतकऱ्यांना मृदा आरोग्य कार्ड जारी करण्याची योजना आखली आहे.यामध्ये पीकांनुसार शिफारसी, आवश्यक पोषक तत्त्वे व त्या शेतीनुसार आवश्यक असणारी खते याचा गोषवारा दिल्याजाईल. जेणेकरून, शेतक्ऱ्यांना योग्य ते पीक निवडण्यास व उत्पादन वाढविण्यास मदत होऊ शकेल.सर्व मातींच्या नमून्यांची चाचणी देशभरातील विविध मृदा चाचणी प्रयोगशाळेत केल्या जाईल.त्यानंतर तज्ज्ञ हे त्या मातीची ताकद व दुबळेपणा (सुक्ष्म पोषक तत्त्वांची कमतरता ) तपासतील व अशा प्रकारच्या मातीत कोणते पीक घ्यावे याचे मार्गदर्शन करतील.या तपासणीचे निकाल व शिफारसी त्या कार्डमध्ये नोंदविल्या जातील.सुमारे १४ करोड शेतकऱ्यांना अशा प्रकारचे कार्ड वितरीत करण्याचा सरकारचा मानस आहे.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →