मृत्यू योग

एक संपूर्ण मार्गदर्शक तुमच्यासाठी.

मृत्यू योग हा योग, नक्षत्र आणि वार यांच्या संयोगाने होतो. पुढील स्थितीमध्ये हा योग होतो.



रविवारी अनुराधा नक्षत्र असल्यास

सोमवारी उत्तराषाढा नक्षत्र असल्यास

मंगळवारी शततारका नक्षत्र असल्यास

बुधवारी आश्विनी नक्षत्र असल्यास

गुरुवारी मृग नक्षत्र असल्यास

शुक्रवारी आश्लेषा नक्षत्र असल्यास

शनिवारी हस्त नक्षत्र असल्यास



हा योग सामान्यत: अशुभ मानला जातो. असे असले तरीही १) हा योग महाराष्ट्रात पहात नाहीत. हा प्रामुख्याने हूण, वंग, व खश या प्रांतातच वर्ज्य मानला जातो. २) शिवाय चंद्रबल असेल तर त्याचा परिहार होऊन मंगलकार्यासाठी या योगाचा दोष रहात नाही.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →