हिंदू पंचांगात दाखविलेला अमृतयोग हा नक्षत्र आणि आणि वार यांच्या संयोगाने होतो.
रविवारी हस्त नक्षत्र असल्यास अमृतयोग होतो.
सोमवारी मृग किंवा श्रवण नक्षत्र असल्यास अमृतयोग होतो.
मंगळवारी आश्विनी नक्षत्र असल्यास अमृतयोग होतो.
बुधवारी अनुराधा नक्षत्र असल्यास अमृतयोग होतो.
गुरुवारी पुष्य नक्षत्र असल्यास अमृतयोग होतो.
शुक्रवारी रेवती नक्षत्र असल्यास अमृतयोग होतो.
शनिवारी रोहिणी नक्षत्र असल्यास अमृतयोग होतो.
अमृतयोग हा सामान्यत: सर्व कार्यास शुभ योग असतो. मात्र काही अमृत योग ठराविक कार्यास वर्ज्य असतात. उदा०
गुरुवारी पुष्य नक्षत्र असल्यास, त्या दिवशी अमृतयोग असला तरी हा दिवस विवाहास वर्ज्य असतो.
शनिवारी रोहिणी नक्षत्र असल्यास, त्या दिवशी अमृतयोग असला तरी हा दिवस प्रयाणास वर्ज्य असतो.
मंगळवारी आश्विनी नक्षत्र असल्यास, त्या दिवशी अमृतयोग असला तरी हा दिवस गृहप्रवेशा वर्ज्य असतो.
अमृतयोग
याचे महत्त्व तुम्हाला आश्चर्यचकित करेल.