मुदुंडी रामकृष्ण राजू

तुम्हाला हे नक्कीच माहित नसेल!

मुदुंडी रामकृष्ण राजू (१९३० - २५ जून, २०२५) हे एक भारतीय भौतिकशास्त्रज्ञ होते, जे कर्करोग उपचारांमध्ये आण्विक भौतिकशास्त्राच्या वापरावरील संशोधनासाठी ओळखले जातात. यांचा जन्म आंध्र प्रदेश राज्यातील भीमावरम शहरात झाला होता. तसेच ते भीमावरम येथे स्थित आंतरराष्ट्रीय कर्करोग केंद्र, महात्मा गांधी मेमोरियल मेडिकल ट्रस्टचे व्यवस्थापकीय विश्वस्त होते. त्यांना अमेरिकेतील विविध संस्थांमध्ये रेडिएशन थेरपीमध्ये ३५ वर्षांचा संशोधन अनुभव आहे, ज्यात मॅसॅच्युसेट्स जनरल हॉस्पिटल, हार्वर्ड विद्यापीठ, मॅसेच्युसेट्स इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी, लॉरेन्स रेडिएशन लॅबोरेटरी, बर्कले येथील कॅलिफोर्निया विद्यापीठ आणि लॉस अलामोस नॅशनल लॅबोरेटरी इत्यादी संस्थांचा समावेश आहे. आणि या विषयावरील अनेक लेखांचे श्रेय त्यांना जाते. राजू यांना २०१३ मध्ये भारत सरकारने पद्मश्री पुरस्कार या चौथ्या सर्वोच्च भारतीय नागरी पुरस्काराने सन्मानित केले होते.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →