मुक्ता आर्ट्स

याबद्दल तुम्हाला सर्वकाही माहित आहे का?

मुक्ता आर्ट्स लिमिटेड ही एक मुंबई मधील भारतीय चलचित्र निर्मिती कंपनी आहे. १९७८ मध्ये स्थापन झालेली ही कंपनी सिनेमा आणि सर्जनशील कलांचे उत्पादन, वितरण, प्रदर्शन करते ज्यात दूरदर्शन मालिका, वेब मालिका आणि माहितीपट देखील आहे. रोखे बाजारावर सूचीबद्ध झालेली ही पहिली हिंदी चित्रपट निर्मिती कंपनी आहे. मुक्ता आर्ट्स लिमिटेडने आजपर्यंत हिंदी आणि इतर भाषांमध्ये ४२ चित्रपटांची निर्मिती आणि सहनिर्मिती केली आहे. मुक्ता मूव्हीज डिस्ट्रिब्युटर्स या नावाखाली ४०० हून अधिक चित्रपट वितरित केले आहेत. २०१२ मध्ये त्याने प्रदर्शन क्षेत्रात प्रवेश केला आणि मुक्ता ए२ सिनेमा या नावाने मल्टिप्लेक्स थिएटर्सची स्वतःची शृंखला सुरू केली, जी आता भारतातील १८ ठिकाणी आहे.

२४ ऑक्टोबर १९७८ रोजी चित्रपट दिग्दर्शक-निर्माते सुभाष घई यांनी स्वतःची चित्रपट निर्मिती कंपनी मुक्ता फिल्म्स स्थापन केली आणि कर्ज नावाच्या चित्रपटाची निर्मिती केली. १९८२ मध्ये, सुभाष घई यांनी मुक्ता आर्ट्स प्रायव्हेट लिमिटेड म्हणून एक नवीन स्वतंत्र कंपनी स्थापन केली आणि २००० पर्यंत हिरो, कर्मा, राम लखन, सौदागर, त्रिमूर्ती, खलनायक, परदेस आणि ताल यासह अनेक चित्रपटांची निर्मिती आणि दिग्दर्शन केले.

मुक्ता आर्ट्स ही तिच्या ताल चित्रपटाद्वारे चित्रपट विमा सुरक्षित करण्याची प्रथा स्थापित करणारी पहिली भारतीय चित्रपट निर्मिती कंपनी ठरली. या विम्याला आता "सिने मुक्ता विमा" असे नाव देण्यात आले आहे.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →