मुकलिंडा

तुमचे ज्ञान वाढवण्यासाठी वाचा.

मुकलिंडा

मुकलिंडा, मुचालिंडा किंवा मुसिलिंडा हे एका नागाचे नाव आहे. याचे रूप सापासारखे आहे. असे मानले जाते की याने गौतम बुद्धांचे त्यांच्या ज्ञानानंतर वाईट तत्वांपासून त्यांचे संरक्षण केले होते.

असे म्हणले जाते की गौतम बुद्धांनी बोधी वृक्षाखाली ध्यान करण्यास सुरुवात केल्यानंतर सहा आठवड्यांनंतर, सात दिवस आकाश अंधारमय झाले आणि एक विलक्षण पाऊस पडला. तथापि, सर्पांचा पराक्रमी राजा, मुकलिंडा, पृथ्वीच्या खालून आला आणि सर्व संरक्षणाचा स्रोत असलेल्या त्याच्या फण्याने त्यांचे संरक्षण केले. जेव्हा मोठे वादळ शांत झाले तेव्हा सर्प राजाने आपले मानवी रूप धारण केले आणि बुद्धापुढे नतमस्तक झाला. त्यानंतर ते आनंदाने आपल्या राजवाड्यात परतले.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →