डॉ. मीनल परांजपे (जन्म : इ.स. १९६०) या आकाशवाणीवर ३५ वर्षे काम करणाऱ्या नाट्यअभिनेत्री विमल जोशी यांच्या कन्या आहेत. डॉ. परांजपे यांनी कौटिल्यीय अर्थशास्त्र हा विषय घेऊन पीएच.डी केले आहे. त्या एका वस्तुसंग्रहालयात व्यवस्थापक होत्या.
डॉ. मीनल परांजपे यांनी काही वर्षांपूर्वी इंंग्रजी भाषा शिकवण्याचा नेहमीची रुळलेला मार्ग बदलून, मुलांच्या मानसिकतेचा अभ्यास करत 'फंक्शनल इंग्लिश'चा कोर्स डिझाईन केला. त्यांचा हा प्रयत्न मराठी माध्यमातील विद्यार्थ्यांसाठी मार्गदर्शक बनला.
हा अभ्यासक्रम बनवायला मीनल परांजपे यांना सहा वर्षे लागली. मुळात स्वतःच्या अदिती नावाच्या मुलीसाठी तयार केलेल्या या कोर्सचे प्रशिक्षण देण्यासाठी मीनलताईंना २००६ सालापर्यंत २० शाळांनी विनंती केली होती.
या अभ्यासक्रमाला आंतरराष्ट्रीय मान्यता आहे.
मीनल परांजपे
या विषयातील रहस्ये उलगडा.