मिहिर सेन

या विषयावर तज्ञ बना.

मिहीर सेन (१६ नोव्हेंबर १९३० - ११ जून १९९७) हे प्रसिद्ध भारतीय लांब पल्‍लेचे जलतरणपटू आणि वकील होते. १९५८ मध्ये डोव्हर ते कॅलेस पर्यंत इंग्लिश चॅनेल जिंकणारे ते पहिला आशियाई होते आणि त्यांनी चौथ्या जलद वेळेत (१४ तास आणि ४५मिनिटे) असे केले. एका कॅलेंडर वर्षात (१९६६) पाच खंडातील महासागर पोहणारे तो एकमेव माणूस होते. यामध्ये पाल्क स्ट्रेट, डार्डनेलेस, बॉस्फोरस, जिब्राल्टर आणि पनामा कालव्याची संपूर्ण लांबी समाविष्ट होती. या अनोख्या कामगिरीने त्यांना गिनीज बुक ऑफ रेकॉर्डमध्ये "जगातील सर्वात लांब अंतराचा जलतरणपटू" म्हणून स्थान मिळवून दिले.

२७ सप्टेंबर १९५८ला डोव्हर ते कॅलेस पर्यंत इंग्लिश चॅनेल जिंकणारे ते पहिला आशियाई होते आणि त्यांनी चौथ्या जलद वेळेत (१४ तास आणि ४५मिनिटे) असे केले. १९५९ मध्ये त्यांना पद्मश्रीने गौरवीण्यात आले.

त्यानंतर एका कॅलेंडर वर्षात (१९६६) पाच महासागर पोहणारे ते पहिले माणूस बनले. सुरुवातीला, पाल्कची सामुद्रधुनी पोहताना भारतीय नौदलाला सहायता करण्यासाठी ४५,००० रुपये उभारावे लागले. सेन यांनी प्रायोजकांमार्फत अर्धे पैसे उभे केले आणि उर्वरित रक्कम तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी पुरवली होती. पुढे भारतीय नौदलाचा (आयएनएस सुकन्या आणि आयएनएस शारदा) पाल्क सामुद्रधुनी पोहण्यासाठी पूर्ण पाठिंबा दिला. ५-६ एप्रिल १९६६ रोजी सिलोन (श्रीलंका) आणि धनुषकोडी (भारत) दरम्यान २५ तास आणि ३६ मिनिटांत पाल्क सामुद्रधुनी ओलांडणारे सेन हे विक्रमी पहिले भारतीय बनले. २४ ऑगस्ट रोजी, जिब्राल्टरची सामुद्रधुनी ८ तास आणि १ मिनिटात पार करणारे ते पहिला आशियाई बनले आणि १२ सप्टेंबर रोजी ४०मैल लांब डार्डनेलेस (गॅलीपोली, युरोप ते सेदुलबहिर, आशिया मायनर) पोहणारे जगातील पहिले माणूस बनले (१३ तास ५५मिनिटांत). त्याच वर्षी २९-३१ ऑक्टोबर रोजी, सेन हे बॉस्फोरस (तुर्की) ४ तासांत पोहणारे पहिले भारतीय आणि पनामा कालव्याचा संपूर्ण (५०-मैल लांबी) ३४ तासांत १५ मि पोहणारे पहिले गैर-अमेरिकन (आणि तिसरे माणूस) होते.

या कामगिरीमुळे त्यांना लांब अंतराच्या पोहण्याच्या गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये स्थान मिळाले आणि पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या हस्ते १९६७ मध्ये त्यांना पद्मभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. त्याच वर्षी, त्याने 'जगाच्या सात समुद्रात साहसी कामगिरी'साठी ब्लिट्झ नेहरू ट्रॉफीही जिंकली.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →