मिरोस्लाफ क्लोजे

हा लेख तुमचा दृष्टिकोन बदलेल.

मिरोस्लाफ क्लोजे

मिरोस्लाफ जोसेफ क्लोजे (जर्मन व पोलिश: Miroslav Josef Klose; ९ जून १९७८) हा एक जर्मन फुटबॉलपटू आहे. पोलंडमध्ये जन्मलेला व २००१ सालापासून जर्मनी राष्ट्रीय फुटबॉल संघाचा भाग राहिलेला क्लोजे सध्या जर्मनीसाठी सर्वाधिक गोल नोंदवलेला फुटबॉल खेळाडू आहे. हा मान ह्यापूर्वी गेर्ड म्युलर कडे होता. क्लोजेने आजवर १३३ सामन्यांमध्ये ७० गोल केले असून त्याला २००६ फिफा विश्वचषक स्पर्धेमध्ये गोल्डन बूट पुरस्कार मिळाला होता. त्याने २००२ फिफा विश्वचषकामध्ये ५, २०१० फिफा विश्वचषकामध्ये ४ तर २०१४ फिफा विश्वचषकामध्ये आजवर 2 गोल नोंदवले आहेत. एकूण १6 गोल नोंदवून तो विश्वचषक स्पर्धांमध्ये सर्वाधिक गोल करणाऱा फुटबॉल खेळाडू एक आहे.

क्लब पातळीवर जर्मन बुंडेसलीगामध्ये अनेक संघांकडून खेळल्यानंतर क्लोजे २०११ पासून इटलीच्या सेरी आमधील एस.एस. लाझियो ह्या क्लबकडून खेळत आहे.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →