मिनियापोलिस-सेंट पॉल हे अमेरिकेच्या मिनेसोटा राज्यातील महानगर आहे. हे महानगर मिसिसिपी, मिनेसोटा आणि सेंट क्रॉई नद्यांच्या संगमाभोवती वसलेले आहे. हे महानगर मिनियापोलिस आणि सेंट पॉल या मोठ्या शहरांसह अनेक शहरांनी बनलेले आहे. या भागाला ट्विन सिटीझ असेही म्हणतात. हे महानगर मिनेसोटाचे आर्थिक, सांस्कृतिक आणि राजकीय केंद्र आहे.
मिनियापोलिस बव्हंश मिसिसिपी नदीच्या पश्चिमेला सरोवराच्छादित भूभागावर वसलेले आहे. शहराचा बहुतांश भाग हा निवासी परिसर असला तरी, त्यात मिल डिस्ट्रिक्ट आणि नॉर्थ लूप क्षेत्रासह काही ऐतिहासिक औद्योगिक क्षेत्रे आहेत. शहराचा मध्यवर्ती भाग व्यवसायांनी भरगच्च आहे. सेंट पॉल शहर मुख्यतः मिसिसिपीच्या पूर्वेस वसलेले आहे. तेथील मध्यवर्तीभाग तुलनेने लहान आहे. सेंट पॉल मधील अनेक परिसर वृक्षाच्छादित असून येथील इमारती व्हिक्टोरियन वास्तुशैलीत बांधलेली आहेत. शहरे आणि आजूबाजूच्या लहान शहरांमध्ये शेकडो तलाव, टेकड्या आणि खाड्या आहेत.
मूळतः ओजिब्वे आणि डकोटा लोकांची वस्ती असलेली ही शहरे नंतर विविध युरोपियन लोकांनी वसवली होती. मिनियापोलिसवर सुरुवातीच्या स्कॅन्डिनेव्हियन आणि लुथेरन स्थायिकांचा मोठा प्रभाव होता, तर सेंट पॉल हे प्रामुख्याने फ्रेंच, आयरिश आणि जर्मन कॅथलिकांनी वसवले होते. दोन्ही शहरी भागात मेक्सिकन, सोमाली, हमोंग, भारतीय, ओरोमो, व्हिएतनामी, कॅमेरोनियन आणि लायबेरियन्ससह अनेक नव्याने स्थलांतरित समूह राहतात.
मिनीयापोलिस-सेंट पॉल
एक संपूर्ण मार्गदर्शक तुमच्यासाठी.