मित्र ही सूर्यमालेपासून सर्वात जवळील ताऱ्यांची प्रणाली आहे. तिचे पृथ्वीपासूनचे अंतर ४.३७ प्रकाशवर्षे (१.३४ पार्सेक) इतके आहे.. तिचे बायर नाव आल्फा सेन्टॉरी (Alpha Centauri; α Cen) आहे व तिला इंग्रजीमध्ये रायजेल केंट (Rigil Kent) असेही म्हणतात. पृथ्वीवरून एकच तारा दिसत असला तरी त्यामध्ये एक द्वैती ताऱ्यांची जोडी आहे. या ताऱ्यांना मित्र "अ" आणि मित्र "ब" म्हणले जाते आणि एक तिसरा तारादेखील आहे जो यांपासून काही अंतरावर असून त्याला मित्र "क" किंवा प्रॉक्झिमा सेन्टॉरी असे नाव दिले गेले आहे. त्यातील द्वैती तारे उघड्या डोळ्यांनी -०.२७ आभासी दृश्यप्रतीचा एकच तारा असल्यासारखे दिसतात. हा ताऱा नरतुरंग या तारकासमूहातील सर्वात तेजस्वी आणि पृथ्वीवरून दिसणाऱ्या ताऱ्यांपैकी (सूर्य वगळता) व्याध आणि अगस्ती ताऱ्यांपाठोपाठ तिसरा सर्वात तेजस्वी आहे. सूर्य वगळता प्रॉक्झिमा सेंटॉरी हा पृथ्वीपासून ४.२४ प्रकाशवर्षे अंतरावरील सर्वात जवळचा तारा आहे. पण तो अतिशय लहान असल्याने दुर्बिणीशिवाय दिसू शकत नाही.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →मित्र (तारा)
थोडक्यात पण महत्त्वाचे.