मिती

तुमचे ज्ञान वाढवण्यासाठी वाचा.

मिती (Dimention) म्हणजे कुठल्याही वस्तूची लांबी, रुंदी, उंची, आकारमान, परिमिती इत्यादी दर्शविण्यासाठी वापरले जाणारे मोजमाप अथवा प्रमाण होय. विज्ञानाच्या दृष्टीने द्विमिती आणि त्रिमिती अस्तित्वात आहेत. आइन्स्टाईनने Space काळ ही चौथी मिती असल्याचे सिद्ध करून दाखवले आहे. अशी चौथी मिती असल्याशिवाय अंतराळातील काळ-काम-वॆगाची गणिते सुटत नाहीत. मात्र या चौथ्या मितीबद्दल सामान्य माणूस फक्त कल्पनाच करू शकतो.

या चौघांशिवाय अनेक मिती असतील, तथापि त्याचा वापर करण्याचे ज्ञान अद्याप माणसाला झालेले नाही. दृष्टी, आवाज आणि स्पर्श यातून तीन मितींचे ज्ञान होते. मानवी डोळ्यांची दृष्टी त्रिमिती आहे. स्ट्रिंग तत्त्वज्ञानानुसार अशा अनेक (दहा) मिती अस्तित्वात आहेत.

युक्लिडियन भूमिती ही सुरुवातीला फक्त द्विमिती भूमिती होती, तिचाच विस्तार होऊन करून पुढे त्रिमिती भूमिती आणि गोलाध्याय भूमिती (Spherical Geometry) विकसित झाली.

संख्याशास्त्रातील (Sample Technicsमधील) काही अडचणी सोडवण्यासाठी गणिताची बहुमिती (Multidimentional) भूमिती नावाची शाखा शिकावी लागते.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →