मिखाइल बुल्गाकोव्ह

तुम्हाला हे नक्कीच माहित नसेल!

मिखाइल बुल्गाकोव्ह

मिखाइल अफानास्येविच बुल्गाकोव्ह (१५ मे, १८९१ – १० मार्च १९४०) हे विसाव्या शतकाच्या सुरुवातीचे एक रशियन कादंबरीकार, नाटककार होते. हे पेशाने वैद्यकीय डॉक्टर होते. त्यांनी वैद्यकीय क्षेत्रातून आपल्या कारकीर्दीची सुरुवात केली असली, तरी पुढे त्यांनी पूर्णवेळ साहित्याला स्वतःला वाहून घेतले. सोव्हिएत संघाच्या सुरुवातीच्या काळात त्यांनी लिहिलेले उपरोधिक आणि उपहासात्मक साहित्य तत्कालीन प्रशासकीय सेन्सॉरशिपमुळे वादात सापडले होते. द मास्टर अँड मार्गारिटा ही त्यांची कादंबरी विसाव्या शतकातील जागतिक साहित्यातील एक महत्त्वपूर्ण कलाकृती मानली जाते. याशिवाय 'हार्ट ऑफ अ डॉग' आणि 'द व्हाईट गार्ड' या त्यांच्या इतर काही प्रमुख प्रसिद्ध रचना आहेत.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →