मासूम हा १९८३ चा भारतीय हिंदी भाषेतील नाट्य चित्रपट आहे, ज्याच्यासोबत शेखर कपूर यांनी दिग्दर्शनात पदार्पण केले. हे १९८० च्या एरिक सेगल यांची कादंबरी मॅन, वुमन अँड चाइल्ड चे रूपांतर आहे. ह्याच कादंबरीच्या आधारे ओलंगल (१९८२) हा मल्याळम चित्रपट आणि मॅन, वुमन अँड चाइल्ड (१९८३) हा अमेरिकन चित्रपटातही होते.
या चित्रपटात शबाना आझमी, नसीरुद्दीन शाह आणि सईद जाफरी मुख्य भूमिकेत आहेत, तर तनुजा आणि सुप्रिया पाठक विशेष भूमिकेत आहेत. यात उर्मिला मातोंडकर, आराधना आणि जुगल हंसराज बालकलाकार म्हणून पदार्पण करत आहेत. चित्रपटाची पटकथा, संवाद आणि गीते गुलजार यांनी लिहिली आहेत तर संगीत आर.डी. बर्मन यांचे आहे.
मासूम (१९८३ चित्रपट)
एक संपूर्ण मार्गदर्शक तुमच्यासाठी.