मार्ली मॅटलिन (जन्म २४ ऑगस्ट १९६५) ही एक अमेरिकन अभिनेत्री, लेखिका आणि कार्यकर्ता आहे. एक अकादमी पुरस्कार, एक गोल्डन ग्लोब अवॉर्ड, आणि एक स्क्रीन ॲक्टर्स गिल्ड अवॉर्ड, व्यतिरिक्त ती असंख्य पुरस्कारांची प्राप्तकर्ता आहे. तिला बाफ्टा अवॉर्ड आणि चार प्राइमटाइम एमी अवॉर्ड्ससाठी नामांकने मिळाली आहे.
ती १८ महिन्यांची असल्यापासून बहिरी आहे. मॅटलिनने वयाच्या सातव्या वर्षी इंटरनॅशनल सेंटर ऑन डेफनेस अँड द आर्ट्स निर्मीत द विझार्ड ऑफ ओझ नाटकामधुन पदार्पण केले.मॅटलिनने रोमँटिक ड्रामा चित्रपट चिल्ड्रेन ऑफ अ लेसर गॉड (१९८६) मध्ये सारा नॉर्मनची भूमिका साकारून अभिनयात पदार्पण केले आणि सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा अकादमी पुरस्कार जिंकला. अकादमी पुरस्कार जिंकणारी ती पहिली कर्णबधिर कलाकार आहे, तसेच सर्वोत्कृष्ट अभिनेत्री श्रेणीतील सर्वात तरुण विजेती आहे. मॅटलिनने पोलिस नाट्य मालिका रिझनेबल डाउट्स (१९९१-१९९३) मध्ये अभिनय केला, ज्याने तिला दोन गोल्डन ग्लोब पुरस्कार नामांकन मिळवून दिले आणि सीनफेल्ड (१९९३), पिकेट फेन्सेस (१९९३), द प्रॅक्टिस (२०००), आणि लॉ अँड ऑर्डर: स्पेशल व्हिक्टिम्स युनिट (२००४-०५) मधील तिच्या पाहुण्या कलाकाराच्या भूमिकेने तिला चार प्राइमटाइम एमी अवॉर्ड नामांकन मिळवले. CODA (२०२१) मधील तिच्या भूमिकेसाठी, तिने मोशन पिक्चरमधील कलाकारांद्वारे उत्कृष्ट कामगिरीसाठी स्क्रीन ॲक्टर्स गिल्ड पुरस्कार जिंकला.
मॅटलिन ही नॅशनल असोसिएशन ऑफ द डेफची प्रमुख सदस्य आहे आणि तिचा दुभाषी जॅक जेसन आहे. २००९ मध्ये, तिला हॉलीवूड वॉक ऑफ फेम वर एक स्टार मिळाला.
मार्ली मॅटलिन
या विषयातील रहस्ये उलगडा.