मार्गशीर्ष हा भारतीय पंचांगानुसार वर्षातील नववा महिना आहे. यालाच अग्रहायण किंवा अगहन असेही म्हणले जाते. हा ३० दिवसांचा असतो.
हा हिंदू पंचांगाप्रमाणेही ९वा महिना आहे. हा महिना सर्वोत्तम आहे असे श्रीकृष्णाने भगवद्गीतेत सांगितले आहे. (मासानां मार्गशीर्षोहम् |)
मार्गशीर्ष महिन्याला हिंदीत अगहन म्हणतात.
बहुधा मार्गशीर्ष महिन्यात केव्हातरी सूर्य धनुराशीत प्रवेश करतो. त्यादिवशी धनुर्मास आणि खरमास सुरू होतात.
मार्गशीर्ष महिना हा ग्रेगोरियन कॅलेंडरच्या नोव्हेंबर किंवा डिसेंबर महिन्यात येतो.
मार्गशीर्ष
याचे महत्त्व तुम्हाला आश्चर्यचकित करेल.