मारेगाव वरचे हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील नांदेड जिल्ह्यातील किनवट तालुक्यातील एक गाव आहे. या गावात धनगर, हाकडी, गोंड (आदिवासी जमात), मांग, मराठा केवळ दोन घरे (पवार आणि कदम) आहेत. या गावातील तरुण मंडळी जास्तीत जास्त सोनार आणि सोन्याचे शुद्धीकरण करणारे कारखाने चालण्यासाठी बाहेर गावी गेले आहेत, वयस्कर मंडळी अल्प उत्पन्न शेती कसत असतात, नोकरी करणाऱ्या ची संख्या कमी आहे.
मारेगाव खालचे हे गाव पैनगंगा नदी तीरावर असून वरचे मारेगाव हे डोंगरावर स्थित आहे. घाटात मारुती मंदिर असून, पावसाळ्यात रमणीय दिसून येते.
मारेगाव वरचे
थोडक्यात पण महत्त्वाचे.