मायकेल कर्क डग्लस (२५ सप्टेंबर, १९४४ - ) हा अमेरिकन चित्रपट अभिनेता आणि निर्माता आहे. याने दोन ऑस्कर, पाच गोल्डन ग्लोब, एक प्राइमटाइम एमी तसेच गोल्डन ग्लोब सेसिल बी. डिमिल पुरस्कार यांसह अनेक पुरस्कार मिळवले आहेत.. डग्लसने ज्युवेल ऑफ द नाइल, फेटल अॅट्रॅक्शन, वॉल स्ट्रीट, वॉर ऑफ द रोझेस, बेसिक इंस्टिंक्ट, डिसक्लोझर, यांसह ३० पेक्षा अधिक चित्रपटांमधून अभिनय केला आहे. डग्लसने वन फ्लू ओव्हर द कुकूझ नेस्ट या चित्रपटाचे निर्माण केले होते.
हा चित्रपट अभिनेता कर्क डग्लस आणि डायना डग्लसचा मुलगा आहे. मायकेल डग्लसने युनिव्हर्सिटी ऑफ कॅलिफोर्निया, सांता बार्बरा येथून अभिनयात पदवी घेतली.
मायकेल डग्लस
तुमचे ज्ञान वाढवण्यासाठी वाचा.