मामासाहेब जगदाळे

तुमचे ज्ञान वाढवण्यासाठी वाचा.

निवृत्ती गोविंदराव जगदाळे उर्फ कर्मवीर डॉ. मामासाहेब जगदाळे (फेब्रुवारी ४, इ.स. १९०३ - मे ३०, इ.स. १९८१) हे महाराष्ट्रातील एक शिक्षणप्रसारक आणि समाजसुधारक होते. कर्मवीर भाऊराव पाटील, शिक्षण महर्षी डॉ.बापूजी साळुंखे, पंजाबराव देशमुख यांनी महाराष्ट्रातील वेगवेगळ्या भागात बहुजनांच्या शिक्षणासाठी प्रसार व्हावा यासाठी संस्था निर्माण केल्या होत्या. यांचे बरोबरीनेच कर्मवीर मामासाहेब जगदाळे यांचे नाव अग्रक्रमाने घेतले जाते. मामांचा उल्लेख बहुजनांच्या शिक्षणाचे कैवारी म्हणून केला जातो. पश्चिम महाराष्ट्रातील सोलापूर व मराठवाड्यातील उस्मानाबाद या सीमावर्ती भागात बहुजन मुलांना शिक्षण घेणे शक्य व्हावे म्हणून बार्शी येथे ‘श्री शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळ ’ स्थापन करून शिक्षणप्रसार केला. संस्थेची बोर्डिंगे, प्राथमिक शाळा (५), माध्यमिक शाळा (१४), उच्च माध्यमिक (१४ ),द्विलक्षी व किमान कौशल्य अभ्यासक्रम (५ ठिकाणी), महाविद्यालये (५ ), कृषितंत्रनिकेतने (२), नर्सिंग महाविद्यालय (१), दवाखाना, शेती, धेनुसंवर्धन, तांत्रिक शिक्षण, छापखाना यांचे मूर्तस्वरूप आज सन २०१८मध्ये लक्षात येते. हे पथदर्शक दिशा देण्याचे द्रष्टेपण मामांच्या विचारात व कृतीत होते. गरीब व होतकरू मुलांना मोफत शिक्षण दिले पाहिजे, पैशावाचून बहुजनांच्या मुलांचे शिक्षण थांबले नाही पाहिजे यासाठी त्यांनी अहोरात्र प्रयत्न केले. त्यामागे उदात्त ध्येयवाद, त्याग व सेवा तसेच कामाची तळमळ व निष्ठा या गोष्टी होत्या. काम करून शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना अधिक रोजगार देत जेणेकरून त्या विद्यार्थ्याला आणि संस्थेला मदत होईल.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →