माती प्रदूषण

या विषयावर तज्ञ बना.

माती प्रदूषण

औद्यागिक सांडपाणी प्रक्रिया न करता आहे तसे जमिनीमध्ये सोडले जाते त्यामुळे माती प्रदूषण होते. तसेच शेतीमधील रासायनिक खतांचा अतिवापर व कचरा जाळल्यानेही माती प्रदूषण होते. जंगलतोडीमुळे झाडांची संख्या कमी होते त्यामुळे जमिनीची मोठ्या प्रमाणात धूप होते. हेही माती प्रदूषण होण्याचे कारण आहे.या प्रदूषणामुळे जमिनीखाली असलेले जीव जंतू मरतात. प्रदूषण स्रोत शोधून त्याचे निर्मूलन केले पाहिजे. . रासायनिक औषध चा वापर जास्त केल्यानी देखिल माती प्रदूषण होते



जमिनीवर नैसर्गिक घटक तसेच इमारती, रस्ते, वस्त्या, उद्योगधंदे, धरण प्रकल्प इ. सांस्कृतिक घटक असतात. हवा पाणी यांच्याप्रमाणे जमीन हाही उपयुक्त व महत्त्वाचा घटक आहे. पृथ्वीवरील जमिनीचा उपयोग, वापर विविध कारणासाठी केला जातो. त्यात वसाहती, शेती, वनस्पती, खाणकाम, उद्योगधंदे, जलसाठे इ.त्यादींचा समावेश होतो. काही जमीन लोकवस्ती, शेती विकासासाठी वापरली जाते. तर काही जमिनीवर पावसाअभावी वाळवंटे, ओसाड प्रदेश आहेत. काही ठिकाणी जमीन मैदानी वेगवेगळ्या मंद, तीव्र उताराची व पत्थरी व डोंगराळ असते, तर काही ठिकाणी जमीन बर्फाच्छादित असते. भुपृष्टावरील खडकाळ जमिनीवरील खडकांची झीज होऊन त्यापासून ‘मृदा’ (माती) निर्माण होते. त्यामुळे खडकातील मूळ गुणधर्म हे मृदेमध्ये आढळतात. मृदा ही सुपीक वा नापीक असते. या भूमीवरील माती किवा मृदा आपण वेगवेगळ्या कारणांसाठी उपयोगात आणतो. या मृदेला आर्द्रतेचा पुरवठा झाला की ती जमीन ही शेती वनस्पतीच्या, फळाफुलांच्या वाढीसाठी उपयुक्त होते. या जमिनीवर सूर्यापासून मिळणारी उष्णताही परिणाम करते. म्हणजे अति थंड हवामानाच्या भागात मृदा बर्फाने आच्छादलेली असते. तेथील हिमक्षेत्रात शेती करता येत नाही. तर अति तीव्र उष्ण हवामानाच्या भागात मृदा ही ओसाड, नापीक, वाळवंटी असते. वाळवंटात पाण्याअभावी मृदा नापीक होते. म्हणून योग्य हवामानात योग्य पाऊस मिळणाऱ्या भागात तसेच योग्य तापमानातील मृदा ही पिकांच्या, वनस्पतींच्या वाढीला योग्य असते. या मृदेतील अनेक खनिज घटक हे पिकांच्या व वनस्पतींच्या वाढीला पोषक असतात. खडकापासून मृदा निर्माण होण्यास हजारो वर्षाचा कालावधी लागतो.

वाढते शहरीकरण, वाढती कारखानदारी, वाढती लोकसंख्या यांच्यामुळे टाकाऊ विषारी पदार्थाची विल्हेवाट लावता येत नाही. ती जमिनीत लावावी लागते. त्यामुळे निसर्गातील जमीन/मृदा हा घटकही प्रदूषित होतो. त्यातून जमीन अपुरी पडते व त्यामुळे भूमिप्रदूषण समस्या निर्माण होतात. व त्यामुळे मृदेचा गैरवापर केला जातो.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →