माओ त्झ-तोंग, माओ झेडॉंग, माओ झेतांग (मराठी लिखाण : माओ त्से-तुंग); चिनी लिपीत: 毛泽东 ; फीनयीन: Mao Zedong / Mao Tse-tung) (२६ डिसेंबर, १८९३; - ९ सप्टेंबर, १९७६) हा चिनी साम्यवादी क्रांतिकारक, राजकारणी, राजकीय तत्त्वज्ञ, चिनी राज्यक्रांतीचा प्रणेता, इ.स. १९४९ साली स्थापन झालेल्या चीनच्या जनता-प्रजासत्ताकाच्या (ची.ज.प्र.) शिल्पकारांपैकी एक शिल्पकार व ची.ज.प्र.चा पहिला चेअरमन, अर्थात अध्यक्ष, होता. इ.स. १९४९ सालापासून इ.स. १९७६ साली मृत्यूपर्यंत त्याने देशावर एकाधिकारशाहीसारखा अंमल गाजवला. मार्क्सवाद-लेनिनवादांत माओने घातलेली सैद्धांतिक भर व माओची राजकीय, सैनिकी धोरणे यांना साकल्याने माओवाद या संज्ञेने उल्लेखले जाते.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →माओ त्झ-तोंग
जाणून घ्या आश्चर्यकारक तथ्ये.