नक्षलवाद ही भारतातील एक उग्रवादी व सशस्त्र माओवादी राजकीय विचारप्रणाली आणि चळवळ आहे. पश्चिम बंगालमधील दार्जिलिंग जिल्ह्याच्या सिलीगुडी उपविभागातील 'नक्षलबारी' या सुमारे २०७ चौ. किमी. क्षेत्राच्या ग्रामीण भागातून या चळवळीची सुरुवात झाली. या भागात प्रामुख्याने संथाळ, ओराओं, मुंडा आणि राजवंशी यांसारख्या आदिवासी जमातींची वस्ती आहे. मे १९६७ मध्ये भारतीय कम्युनिस्ट पक्ष (मार्क्सवादी) पक्षाच्या नक्षलबारी शाखेतील कट्टरपंथी नेत्यांनी मध्यवर्ती नेतृत्वाला डावलून जमीनदारांविरुद्ध आदिवासी आणि शेतमजुरांचा सशस्त्र उठाव घडवून आणला. या घटनेपासून 'नक्षलवाद' या संज्ञेचा उगम झाला.
"सशस्त्र क्रांतीने सत्ता संपादन" आणि "माओ त्झ-तोंग हे आमचे प्रमुख" या घोषणांसह सुरू झालेल्या या चळवळीने सुरुवातीलाच देशाचे लक्ष वेधून घेतले. चारू मजुमदार, कानू सन्याल आणि जंगल संथाळ हे या सुरुवातीच्या उठावाचे मुख्य सूत्रधार होते.
नक्षलबारी उठाव
थोडक्यात पण महत्त्वाचे.