माउंट मासिव्ह अमेरिकेतील रॉकी माउंटन्स पर्वतरांगांचा भाग असलेल्या सावाच पर्वतरांगेतील एक शिखर आहे. १४,४२८ फूट उंचीचे हे शिखर कॉलोराडो राज्यात आहे. हे शिखर रॉकी माउंटन्स रांगेतील दुसऱ्या क्रमांकाचे सर्वोच्च शिखर आहे. याची उंची माउंट एल्बर्टपेक्षा १२ फुटांनी कमी तर माउंट हार्वर्डपेक्षा ७ फुटांनी जास्त आहे.
१९२९मधील जागतिक मंदीनंतर माउंट एल्बर्ट आणि माउंट मासिव्हच्या उंचीबद्दल अनेक वाद झालेले आहेत. माउंट मासिव्हचे चाहते अनेकदा येथे दगडधोंडे रचून त्याची उंची माउंट एल्बर्टपेक्षा जास्त करण्याचा प्रयत्न करतात. माउंट एल्बर्टचे चाहते हे मोडून पाडतात.
माउंट मासिव्ह
एका नवीन दृष्टिकोनातून पहा.