महाराष्ट्रातील राजकारण

हा लेख तुमचा दृष्टिकोन बदलेल.

महाराष्ट्रातील राजकारण हे भारतीय राजकारणावर प्रभाव टाकणारे राजकारण आहे. २०१४ च्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीनुसार, राज्यात प्रामुख्याने भाजप, काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस तीन राष्ट्रीय पक्ष आणि शिवसेना हा एक प्रादेशिक पक्ष असे हे ४ मुख्य भूमिकेतील पक्ष आहेत. २०१८ मध्ये वंचित बहुजन आघाडी या पक्षाची स्थापना करण्यात आली. १५ मार्च २०१९ रोजी, भारतीय निवडणूक आयोगाने जाहीर केलेल्या राजकीय पक्षांच्या यादीनुसार महाराष्ट्रात एकूण १४५ नोंदणीकृत पक्ष आणि २ प्रादेशिक/राज्यस्तरीय पक्ष आहेत. महाराष्ट्र नवनिर्माण सेना व शिवसेना हे राज्यातील दोन प्रादेशिक पक्ष आहेत. तर भारतामध्ये एकूण २,३३४ राजकीय पक्ष असून, यापैकी ७ राष्ट्रीय पक्ष, २६ राज्यस्तरीय पक्ष आणि इतर २,३०१ नोंदणीकृत पक्ष आहेत.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →