महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळ हे महाराष्ट्र शासनाचे आधिपत्याखाली असलेले मंडळ आहे.
या मंडळाची स्थापना १ जुलै १९५३ रोजी महाराष्ट्र कामगार कल्याण निधी अधिनियम १९५३ नुसार करण्यात आली आहे. महाराष्ट्र राज्यातील कामगारांच्या सर्वांगिण विकासासाठी कामगार कल्याण मंडळ काम करते. अधिनियमाच्या कलम ६ ब ब नुसार कामगार, मालक, शासन अशी त्रिपक्षीय वर्गणी (MLWF – महाराष्ट्र लेबर वेल्फेअर फंड) दर ६ महिन्यातून (जून व डिसेंबर) मंडळाला मिळते. या निधीतून कामगार व त्यांच्या कुटुंबियांसाठी कल्याणकारी योजना राबविण्यात येतात.
महाराष्ट्र कामगार कल्याण निधी अधिनियम १९५३ महाराष्ट्र राज्यातील विनिर्दिष्टीत आस्थापनांना लागू आहे. यात द फॅक्टरी ॲंक्ट १९४८ अंतर्गत येणारे सर्व कारखाने, महाराष्ट्र शॉप्स अँड एस्टॅब्लिशमेंट ॲंक्ट १९४८ अंतर्गत येणारी अशी दुकाने व आस्थापना ज्यामध्ये किमान ५ कामगार आहेत आणि द मोटर ट्रान्सपोर्ट वर्कर्स ॲंक्ट १९६१ अंतर्गत नोंदित आस्थापनांचा समावेश होतो.
महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळ
एक संपूर्ण मार्गदर्शक तुमच्यासाठी.