साथरोग अधिनियम १८९७ हा बुबोनिक प्लेगचा सामना करण्यासाठी प्रथम १८९७ साली बनविला गेला होता. हा कायदा रोग व रोगाचा प्रसार नियंत्रित करण्यासाठी आवश्यक उपाययोजनांच्या अंमलबजावणीसाठी आवश्यक असणारी विशेष शक्ती शासनाला देते. साथीच्या आजारांवर नियंत्रण ठेवण्यासाठी हा कायदा आहे.
या कायद्याचा स्वाइन फ्लू, कॉलरा, मलेरिया आणि डेंग्यू सारख्या विविध रोगांचा नियंत्रणात नियमित वापर केला जात आहे. २०१८ मध्ये, गुजरातमधील एका भागात कॉलराचा प्रसार होऊ लागल्याने हा कायदा लागू करण्यात आला. २०१५ मध्ये याचा वापर चंदीगडमध्ये डेंग्यू आणि मलेरियाशी निगडीत करण्यासाठी केला गेला होता आणि २००९ साली पुण्यात स्वाईन फ्लूचा सामना करण्यासाठी याचा वापर करण्यात आला होता. मार्च २०२० पासून, कोरोनाव्हायरस रोगाचा प्रसार मर्यादित करण्यासाठी हा कायदा संपूर्ण भारतभर राबविला जात आहे.
महामारी रोग कायदा, १८९७
थोडक्यात पण महत्त्वाचे.