हिंदू धर्मातील महादेवीच्या नऊ रूपांच्या नवदुर्गा मध्ये महागौरी हे आठवे रूप आहे. नवरात्रीच्या आठव्या दिवशी तिची पूजा केली जाते. महागौरी तिच्या भक्तांच्या सर्व इच्छा पूर्ण करण्यास सक्षम असल्याचे मानले जाते.
महागौरी या नावाचा अर्थ अत्यंत तेजस्वी, स्वच्छ-शुभ्र, चंद्रासारखी चमक असलेली असा होतो. (महा = महान; गौरी = तेजस्वी, स्वच्छ).
महागौरी ही पांढऱ्या बैलावर स्वार पांढऱ्या वस्त्रांमध्ये दाखवली जाणारी पवित्रतेची प्रतीक आहे. तिला चार हातांनी चित्रित केले आहे: तिच्या उजव्या वरच्या हातात त्रिशूळ आहे आणि डाव्या हातात डमरू आहे. अभयमुद्रेमध्ये तिचा उजवा हात आहे.
महागौरी
जाणून घ्या आश्चर्यकारक तथ्ये.