मलय (मलयः ओरॅंग मेलयु, जावी: ڠورڠ ملايو) हा एक ऑस्ट्रोनेशियन वंशीय गट आहे. हा वंशीय गट मुख्यत्वे मलय द्वीपकल्प, इंडोनेशियातील पूर्वेकडील सुमात्रा आणि किनारपट्टी बोर्निओ, तसेच या स्थानांमधील लहान लहान बेटे या ठिकाणी आढळतो. या भागाला मलय जगत म्हणून ओळखले जाते. ही स्थाने सध्या मलेशिया (मलय राज्य), ब्रुनेई, सिंगापूर, इंडोनेशिया आणि दक्षिणी थायलंड या देशांचा भाग आहेत.
मलय वंशीय गटांच्या उपसमूहांमध्ये अनुवंशिक, भाषिक, सांस्कृतिक, कलात्मक आणि सामाजिक विविधता आहे. याचे कारण मुख्यत: मेरीटाईम आग्नेय आशियामधील शेकडो वर्षांत झालेल्या वेगवेगळ्या प्रादेशिक वंशाच्या आणि जमातींच्या स्थलांतरामुळे असे घडले आहे. ऐतिहासिकदृष्ट्या, मलय गट पूर्वीच्या मलायिक-भाषिक ऑस्ट्र्रोनीशियन आणि ऑस्ट्र्रोएशियाईक जमातींपासून तयार झाला आहे. या गटाने अनेक प्राचीन सागरी व्यापार राज्ये आणि राज्ये स्थापित केली. यातील महत्त्वाची नावे म्हणजे ब्रुनेई, केडा, लंगकासुका, गंगा नेगारा,ची तू, नाखों सी थम्मरट, पाहंग, मेलयु आणि श्रीविजय ही आहेत.
मलयांच्या इतिहासामध्ये १५ व्या शतकात मलाक्का सल्तनत मध्ये मोठी क्रांती घडवून आणली, याचे दूरगामी राजकीय आणि सांस्कृतिक पडसाद दिसून येतात. मलय वांशिक गट साधारणतः इस्लाम धर्म, मलय भाषा आणि परंपरा या गोष्टींनी अधोरेखित होतो. परिणामी या प्रदेशातील हा एक मुख्य वांशिक गट बनला आहे. मलय वांशिक गटाने साहित्य, आर्किटेक्चर, पाकपरंपरा, पारंपारिक वेषभूषा, परफॉर्मिंग आर्ट्स, मार्शल आर्ट्स आणि शाही दरबाराच्या परंपरेत योगदान दिले आणि आदर्श घडवले. ज्याचे नंतर मलय सुलतानांनी अनुकरण केले. मलय सुलतानांच्या सोनेरी काळात मलय द्वीपकल्प, सुमात्रा आणि बोर्निओ मधील बऱ्याच आदिवासी जमातींचे, विशेषतः बाटक, दयाक, औरंग आस्ली आणि औरंग लाऊत, इस्लामीकरण आणि मलयिसेशनच्या करण्यात आले. आज, काही मलय लोकांचे पूर्वज 'अनक दगंग' ("व्यापारी") मानले जातात ज्यात बंजार, बुगिस, मिनांगकाबाऊ आणि एसेहनी लोक मोडतात. तर काहींचे पूर्वज इतर देशांमधून स्थलांतरित झालेले आहेत.
इतिहासामध्ये मलय लोक समुद्र किनाऱ्यावरील व्यापारी समुदाय म्हणून ओळखले जात. त्यांनी इतर स्थानिक वांशिक गटांतून बरीच सांस्कृतिक वैशिष्ट्ये आत्मसात केली, सामायिक केली आणि प्रसारित केली. स्थानिक वांशिक गट जसे की मिनांग, एकेनीज आणि काही प्रमाणात जावानीज सांस्कृतिक गट. तथापि मलय संस्कृती अधिक स्पष्टपणे इस्लामी असल्याने ती बहु-धार्मिक जावानीज संस्कृतीपेक्षा भिन्न आहे. पारंपारिक मलेशियन संस्कृती संबंधित बेटावी, बंजार, केप मलय, कोकोस मलेशियन आणि श्रीलंका मलय संस्कृतींच्या विकासाचा प्रमुख स्रोत मानला जातो. तसेच मोंबी व्यापार आणि क्रॉले गटातील भाषा उदा ॲम्बोनीज मलय, बाबा मलय, बीटावी भाषा आणि मनाडो मलय भाषा या देखील मलय संस्कृतीमध्येच विकसित झाल्या आहेत.
मलय (वांशिक गट)
एक संपूर्ण मार्गदर्शक तुमच्यासाठी.