मराठी संगीत नाटक ही मराठी रंगभूमीने जागतिक रंगभूमीला दिलेली देणगी आहे, असे मानले जाते. विष्णूदास भावे यांनी मराठी रंगभूमीचा श्रीगणेशा केला तर संगीत नाटकाचा लौकिक अर्थाने प्रारंभ अण्णासाहेब किर्लोस्कर यांच्या संगीत शाकुंतल (१८८०) या नाटकाने झाला. त्यानंतर सौभद्र, रामराज्यवियोग, द्रौपदी, विद्याहरण, शारदा, स्वयंवर, मानापमान, भंगले स्वप्न महाराष्ट्रा, संशयकल्लोळ, एकच प्याला ...अशा संगीत नाटकांची परंपराच निर्माण झाली. १८८० ते १९३० हा संगीत नाटकांच्या आणि पर्यायाने नाट्यसंगीताचा सर्व अर्थांनी सुवर्णकाळ होता.
डिसेंबर १९१६ मध्ये संगीत स्वयंवर रंगभूमीवर आले. या नाटकात ३९ रागांचा वापर करून बांधलेली ५५ नाट्यगीते होती. या कालखंडात गाणी पुढे आणि नाटक मागे अशी परिस्थिती होती. इ.स.१९४२ मध्ये रंगभूमीवर आलेल्या ’संगीत कुलवधू’ या नाटकाद्वारे मास्टर कृष्णराव यांनी ही परिस्थिती बदलली. त्यांनी नाट्यपदांना भावगीतांच्या वळणाने जाणाऱ्या चाली दिल्या होत्या. इ.स. १९६० नंतर पं जितेंद्र अभिषेकी यांनी नाट्यपदांमध्ये सुगम संगीताला प्राधान्य दिले. त्यामुळे नाटकांत ताना मारून गाणारे नट सुगम संगीत गाऊ लागले. इ. स. १९७० च्या दशकात, बशीर मोमीन कवठेकर यांनी 'भंगले स्वप्न महाराष्ट्रा' या त्यांच्या दमदार ऐतिहासिक नाटकात कथानकाला अनुसरून लावणी प्रधान संगीत रचनेचा प्रयोग केला.
समीक्षकांनी व अभ्यासकांनी संगीत नाटकांच्या इतिहासातील काळाचे टप्पे पुढीलप्रमाणे मानले आहेत.
किर्लोस्कर-देवल काळ - १८८० -१९१०
खाडिलकर-बालगंधर्व काळ - १९१० - १९३०
अत्रे-रांगणेकर काळ - १९३० - १९६०
गोखले-कानेटकर काळ - १९६० - १९८०
मराठी नाट्यसंगीत
याचे महत्त्व तुम्हाला आश्चर्यचकित करेल.