मयूर जोशी हे सनदी लेखापाल, लेखक आहेत आणि भारतातील न्यायवैद्यक लेखापरिक्षणाचे आद्यप्रवर्तक मानले जातात. पुण्यातील सर परशुरामभाऊ कॅालेज मधून त्यांचे शिक्षण झाले.
प्रशिक्षणाने सनदी लेखापाल असलेल्या मयूर जोशी २००६ सालात आर्थिक घोटाळ्यांना बंधन घालण्यासाठी न्यायवैद्यक लेखापरिक्षणाचे तंत्रशुद्ध प्रशिक्षण देणा-या इंडियाफॅारेंसिक या संस्थेची स्थापना केली.
२००९ सालात सत्यम घोटाळा उघडकीला आला तेव्हा त्या चौकशी समितीमध्ये मयूर जोशी यांचा सहभाग होता म्हणून त्यांना महत्व आहे. अमेरिकेतील न्यूयॅार्क टाईम्सने देखील जोशी यांच्या कार्याची दखल घेतली होती.
२००८ साली प्रसिद्ध केलेल्या संशोधनात त्यांनी हे वर्तवलेलं की भारतात नोंदणीकृत कंपन्या त्यांच्या हिशोबाची खोटी पुस्तकं लिहतात. जानेवारी २००९ मध्ये म्हणजे केवळ सहाच महिन्यात त्यांची भविष्यवाणी खरी ठरली. त्यानंतर भारतातल्या अनेक महत्वपूर्ण घोटाळ्याच्या तक्रारी तडीस लावताना त्यांची भूमिका महत्वपूर्ण राहिली आहे.
आंतरराष्ट्रीय स्तरावर दिला जाणारा ‘सर्वोत्कृष्ट सत्यशोधक’ हा जगातील सर्वोच्च पुरस्कार देखील त्यांना दिला गेला आहे. आर्थिक घोटाळे, भ्रष्टाचार रोखण्यात भरीव कामगिरी करणाऱ्या एका तज्ज्ञाला दरवर्षी हा पुरस्कार दिला जातो. या नंतर त्यांची असोसिएशन ॲाफ फ्रॅाड एक्झामिनर्स या संस्थेच्या भारतातील संचालक मंडळावर निवड झाली. त्यांच्या आधी किंवा त्या नंतर हा पुरस्कार इतर कोणत्याही भारतीयाला दिला गेला नाहीये.
त्यांनी या विषयावर शिक्षण देण्यासाठी इंडीयाफॉरेंसिक नावाची संस्था चालू केली. ही संस्था फॉरेंसिक अकाउंटींगमधील जगातली दुसरी मोठी संस्था समजली जाते.या संस्थेद्वारे सर्वप्रथम त्यांनी भारतात होत असलेल्या भ्रष्टाचाराला वाचा फोडली. भारतात भ्रष्टाचार बोकाळला आहे सर्वांना माहिती असले तरी एकूण किती रूपयांचा भ्रष्टाचार भारतात होतो याची कोणतीच गणना होत नसे. भ्रष्टाचारामुळे होणारा एकूण तोटा त्यांनी सर्वप्रथम भारताच्या जनते समोर मांडला.
मयूर जोशी
एक संपूर्ण मार्गदर्शक तुमच्यासाठी.